
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात येणार्या पर्यटकांच्या गाड्यांची पोलीस प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. अन्य राज्य अथवा विदेशातून आलेल्या सर्व पर्यटकांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीस पाठवले जात आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात पर्यटकांची नाव व पत्ता नोंदणी करून डॉक्टर मार्फत प्राथमिक तपासणी केली जात आहे. पर्यटकांना कोरोना सदृश लक्षणे असल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी ओरोस येथे पाठवले जाईल. कोणतेही लक्षणे नसल्यास त्यांनां तपासणी नंतर सोडण्यात येत आहे. संशयित रुग्णासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयातही विशेष वॉर्ड बनवण्यात आला आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी राऊत यांनी दिली.
एकूणच रविवारी सकाळ पासून पर्यटक वाहने तपासणी मोहीम कडक झाल्याने ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे. महसूल विभागही तपासणीसाठी आलेल्या पर्यटकांची नोंद ठेवत आहेत.

























































