
केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत (मनरेगा) पश्चिम बंगालची थकबाकी देण्यास अत्यंत विलंब करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याविरोधात आपला पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) 5 आणि 6 जून रोजी निषेध मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.
100 दिवसांच्या कामाचे पैसे द्या- ममता
बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘प्रत्येक ब्लॉकमध्ये तुम्ही 5 आणि 6 जून रोजी रस्त्यावर उतरा आणि मनरेगा अंतर्गत राज्याला केंद्र सरकारकडून बाकी असलेल्या देयांची मागणी करा. आमच्या 100 दिवसांच्या कामाचे पैसे द्या असा नारा द्या.’ ममता म्हणाल्या की, केंद्र सरकार आम्हाला 100 दिवसांच्या कामाचे पैसे देत नाहीत. याविरोधात आमच्या सर्व संघटना 5 आणि 6 जूनला रॅली काढणार आहेत.’
स्वयंपाक चुलीवरच करावा लागेल असे दिसते- ममता
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ममता म्हणाल्या, ‘मंगळवारी रेल्वेतील 90 हजार रिक्त पदे रद्द करण्यात आली, म्हणजे केंद्र हळूहळू दुकान बंद करत आहेत. उजाला (योजना) कुठे आहे? मुळात हा ‘हवाला’ आहे. एका गरीबाला LPG सिलिंडर घेण्यासाठी 800 रुपये मग कुठून मिळतील? मला वाटतं आपल्याला चुलीवरच स्वयंपाक करावा लागेल.’ भाजप सरकारमुळे बेरोजगारी 40 टक्क्यांनी वाढल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की त्यांचा पक्ष 2019 मध्ये बांकुरा जिल्ह्यातील बांकुरा आणि बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघ जिंकू शकला नाही, परंतु आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील लोक टीएमसीला मतदान करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, ‘आम्ही बांकुरा जिल्हा जिंकू शकलो नाही तेव्हा मी नाराज झालो होतो. आम्ही इथे लोकसभेच्या दोन जागा जिंकू शकलो नाही… कदाचित आम्ही त्यावेळी चुकलो होतो.’
बॅनर्जी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना म्हणाल्या की, ‘दीदी जर पराभवातून सावरू शकतात, तर तुम्ही का नाही. गरीब लोकांसोबत राहा. आदिवासींच्या जमिनी कुणाला विकता येणार नाहीत. आम्ही झुकणार नाही…’
























































