इंग्रजांप्रमाणेच भाजप विरोधकांचे दमन करत आहे; ममता बॅनर्जी केंद्र सरकारवर कडाडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पैसे घेत संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी लोकसभेच्या एथिक्स समितीने मोईत्रा यांना समन्स बजावले आहे. या सर्व प्रकरणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. इंग्रज ज्याप्रमाणे विरोधकांचा छळ करायचे, त्याचप्रमाणे भाजपही विरोधकांना छळून त्यांचे दमन करत आहेत, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पैसे घेत संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी वकील देहादराई, भाजप खासदार निशिकांत दुबे लोकसभेच्या एथिक्स समितीसमोर उपस्थित झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या सदस्य महुआ मोईत्रा यांच्यावरील पैसे घेत प्रश्न विचारल्याच्या आरोपांच्या संदर्भात वकील जय अनंत देहाडराय आणि भाजप नेते निशिकांत दुबे गुरुवारी लोकसभेच्या एथिक्स समितीसमोर त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीत, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावरील आरोपांबाबत देहादराईने सादर केलेल्या कागदपत्रांचा हवाला दिला आहे. ओम बिर्ला यांनी हे प्रकरण भाजप सदस्य विनोदकुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवले होते. देहादराई यांनी एथिक्स समितीसमोर आपले म्हणणे नोंदवले, तर दुबे दुपारी पॅनेलसमोर हजर झाले. समिती जे काही प्रश्न विचारेल त्याला उत्तर देऊ, असे दुबे यांनी पत्रकारांना सांगितले. मोईत्रा यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, कागदपत्रे सत्य सांगत आहेत, असेही ते म्हणाले.