ममता बॅनर्जी अयोध्येला जाणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे. 22 जानेवारी रोजी थाटामाटात होणाऱया या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी या जाणार नसल्याचे तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने बुधवारी सांगितले. तृणमूल काँग्रेसचा कुणीच प्रतिनिधी कार्यक्रमात सहभागी होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारण आणि धर्म यांची सरमिसळ आपला पक्ष करत नाही, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. याआधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी यांनीही अयोद्धेला जाण्याचे निमंत्रण धुडकावले.