करबुडेत तरुण-तरुणीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यांतील करबुडे येथील शितपवाडीत एका तरुण आणि तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

स्वप्नील वसंत मालप वय (२६) आणि सुचवतां काशीनाथ मालप वय (१९) अशी त्या दोघांची नावे असून ते दोघेही निवळी गावातील रहिवासी होते. शुक्रवारी दुपारी या दोघांनी करबुडे शितपवाडी येथील संतोष हरी शितप यांच्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. संतोष शितप यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.