
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील घोडाझरी अभयारण्याजवळ असलेल्या तुकूम गावातील घटना, राजेंद्र गणवीर (55) काल संध्याकाळी शेतातून परत आले नाहीत. आज सकाळी शोधाशोध केल्यावर शेताजवळ त्यांचा मृतदेह आढळला.




























































