
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात आणखी एका जणाचा मृत्यू झाला आहे. राजू गुजलेवार (35) असं मृत तरुणाचे नाव आहे.
राजू बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी चंद्रपूरलगत जंगलात गेला होता. याचवेळी त्याच्यावर वाघाने हल्ला केला आणि लचके तोडल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना समोर आली. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्याना माहिती देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह विच्छेदनासाठी रवाना केला आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर आता वाघ आल्याचे या घटनेवरून दिसून आले.
























































