
देव देतो ते छप्पर फाड के असे म्हटले जाते. एका व्यक्तीचे नशीब असेच फळफळले. त्याला घर साफ करताना त्याच्या वडिलांचे 35 वर्षे जुनी कागदपत्रे सापडली. वडिलांनी 90 च्या दशकात शेअर्स खरेदी केले होते. त्या शेअर्सची किंमत आज कोटय़वधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वडिलांनी 1990 मध्ये जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सुमारे 1 लाख रुपयांना खरेदी केले होते. 30 वर्षे सुरक्षित ठेवल्यानंतर, आज त्यांची एकूण किंमत सुमारे 80 कोटी रुपये झाली आहे. 80 कोटींचे शेअर्स मिळाल्याने या व्यक्तीचे नशीब फळफळले आहे.