सुपरमार्केटमधल्या खाण्याच्या वस्तूंना रक्ताचे इंजेक्शन टोचले, लंडनमधली काही दुकाने बंद केली

लंडनमध्ये एक विचित्र आणि भयंकर घटना घडली आहे. इथल्या बऱ्याच सुपरमार्केटमध्ये असलेल्या खाण्याच्या वस्तूंना रक्ताने भरलेले इंजेक्शन टोचण्यात आले आहे. या प्रकरणा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून आरोपीने स्वत:चंच रक्त काढून ते इंजेक्शनद्वारे टोचलं असल्याचं कळालं आहे. जॉगिंग करत असलेल्या एका व्यक्तीला आरोपीने सिंरींज फेकून मारली होती. यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

लंडनच्या हॅमरस्मिथ भागात टॉम हॅरिंग्टन हा जॉगिंग करत असताना एका तरुणाने पाठून त्याला चिडवलं होतं. जाड्या पळ लवकर असं म्हणत त्याने टॉमला चिडवलं होतं. आरोपीच्या हातात सिलिंडरच्या आकाराची एक केस होती, ज्यात किमान 30 सिरींज होत्या असं टॉमचं म्हणणं आहे. यातली एक सिरींज काढून आरोपीने टॉमच्या पायावर फेकली होती. टॉमने त्याला असं का केलं ? असं विचारलं असता त्याने ‘ती फ्रेश आहे’ असं विचित्र उत्तर दिलं होतं. पोलिसांनी आरोपीला पकडलं असून त्यांना संशय आहे की त्याने किमान 3 सुपरमार्केटमधील अन्नात स्वत:चं रक्त असलेलं इंजेक्शन टोचलं आहे. त्याच्या रक्तामुळे किती खाद्यपदार्थ दूषित झाले आहेत, हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काही सुपरमार्केट बंद करण्यात आली असून हॅमरस्मिथ आणि फुलहॅम परिषदेने आपात्कालीन अलर्ट घोषित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या