मित्रांचे एकाच मुलीवर प्रेम जडले, एकाने दुसऱ्याला संपवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील पेठ-जांभूळवाडीतील महाविद्यालयीन तरुणाचा प्रेमप्रकरणातून त्याच्या मित्रानेच खून केला. पेठ-जांभुळवाडी रस्त्यावर बुधवारी दुपारी हा थरार झाला. जवळपास एक किलोमीटर पाठलाग करून धारदार शस्त्र्ााने वार करून खून करण्यात आला.

अभिजित हरी शेलार (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनानंतर आरोपी राजेंद्र बांदल (वय 25, रा. जांभुळवाडी) हा ईश्वरपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. प्रेमप्रकरणातून अभिजित याचा चाकूचे वार करून खून केल्याची कबुली आरोपी राजेंद्र बांदल याने पोलिसांना दिली.

अभिजित व राजेंद्र हे चांगले मित्र होते. दोघेही अविवाहित असून, सेंट्रिंग कामाबरोबरच मोलमजुरी करत होते. मृत अभिजित एसवायबीएमध्ये शिकत होता. बुधवारी सकाळपासून हे दोघे एका दुचाकीवरून फिरत होते. मृत अभिजित याचे पूर्वी एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते.

अभिजितचा प्रेमभंग झाल्याने राजेंद्र बांदल याचे त्याच मुलीसोबत सूत जुळले. यामुळे त्या दोघांमध्ये वाद होत असत. अभिजित आपल्या प्रेमाच्या आड येत आहे, याचा राग मनात धरून राजेंद्र बांदल याने त्याचा खून केला. याप्रकरणी अभिजितच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बांदल याला अटक केली आहे.