यू टय़ूब पाहून केला खंडणीचा फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

झटपट पैसे कमावण्याकरिता युटय़ूबवर व्हिडीओ पाहून छोटा शकील आणि डी गँगचा हस्तक असल्याचे भासवून खंडणीचा पह्न करणाऱयाच्या खेरवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दीपकपुमार सत्यनारायण यादव असे त्याचे नाव आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

खेरवाडी परिसरात ज्वेलर्सचे एक दुकान आहे. पाच दिवसांपूर्वी त्या ज्वेलर्सच्या मालकाला अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. दोन लाख रुपयांची खंडणी दे असे सांगून ज्वेलर्सला धमकावले. ज्वेलर्सच्या मालकाने घाबरून खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ 8 चे उपायुक्त अनिल पुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सोहन कदम यांच्या पथकाने तपास करून कारवाई केली.

सिमकार्डचा असाही वापर
दीपकला काही दिवसांपूर्वी रस्त्यावर एक सिमकार्ड मिळाले होते. त्याने प्रीपेड सिमकार्डचे रिचार्ज केले. त्यानंतर त्याने खंडणीच्या पह्न आणि मेसेजकरिता त्या सिमकार्डचा वापर केला होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे.

कर्जबाजारी झाला आणि केला गुन्हा
दीपक हा मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. तो वर्षभरापूर्वी मुंबईत आला होता. एसी दुरुस्तीचे काम तो शिकला. पण काम न जमल्यामुळे तो बेरोजगार होता. बेरोजगारीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. झटपट पैशांकरिता त्याने महिनाभरापूर्वी यूटय़ूबवर व्हिडीओ पहिला. छोटा शकील आणि डी गँगच्या नावाने खंडणीकरिता पह्न किंवा मेसेज केल्यास लोक घाबरून पैसे देतील असे त्याला वाटत होते. दीपक हा खेरवाडी परिसरात फिरायचा. त्या परिसरातील ज्वेलर्स आणि काही दुकानदार दुकानांच्या पाटय़ांवर पत्त्यासह मोबाईल क्रमांक लिहायचे. त्या पाटय़ांवरचे नंबर दीपक लिहून घ्यायचा. तसेच सांगलीतील एकाची गाडी खेरवाडीजवळ आली होती. त्या गाडीवर मोबाईल क्रमांक होता. तोही क्रमांक दीपकने लिहून त्यालाही पह्न केला. दीपकने आतापर्यंत तिघांना मेसेज केला, मात्र कोणीही त्याला रिप्लाय दिला नव्हता.