विवाहित प्रेयसीला रात्री भेटायला आला प्रियकर, सासऱ्याने विवस्त्र करून बेदम चोपला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार मुलांची आई असलेल्या विवाहित प्रेयसीला रात्रीचं भेटायला जाणं एका तरुणाच्या भलतंच अंगाशी आलं आहे. तिच्या सासऱ्याने त्याला रंगेहात पकडल्याने विवस्त्र करून बेदम मारहाण केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या गोपालगंज येथे ही घटना घडली. गोपालगंज येथील मुर्गिया नावाच्या गावात ही महिला राहते. रात्रीच्या वेळी तिला भेटण्यासाठी हा प्रियकर तिच्या घरी थडकला. महिलेवर आधीच संशय आल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावर पाळत ठेवली होती. रात्री प्रियकर तिच्या खोलीत शिरल्याची चाहुल लागताच सासरकडची मंडळी सावध झाली. त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडलं.

त्यांनी या तरुणाला खेचत घराबाहेर काढलं. इतक्यावरच न थांबता महिलेच्या सासऱ्याने त्याचे सगळे कपडे उतरवले आणि त्याला बेदम मारहाण सुरू केली. हा आवाज ऐकून शेजारीपाजारी गोळा झाले. त्यांना हा प्रकार कळताच त्यांनीही त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केली. त्याच्या पायात रश्शी बांधून त्याला खेचत नेण्यात आलं. सुदैवाने तिथे काही ज्येष्ठ ग्रामस्थांनी हा प्रकार थांबवला आणि त्या प्रियकर तरुणाची सुटका केली.

या हाणामारीत तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.