नागपुरमध्ये सख्ख्या मुलीवर आणि पुतण्यावर बलात्कार, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या सख्ख्या मुलीवर आणि पुतण्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागपुरमध्ये एक व्यक्ती आपल्या सख्ख्या मुलीवर बलात्कार करत होता. तेव्हा त्याच्या पत्नीने पाहिले. महिलेने तत्काळ पोलिसांना पाचारण केले आणि आरोपीविरोधात तक्रार केली. आरोपीने आपल्या पुतण्यावरही बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

आरोपी व्यक्ती तृतीयपंथी बनून रस्त्यावर भीक मागायचा. त्याच्या छळाला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.