बायकोला सोशल मीडियाचे व्यसन; नवऱयाला हवा घटस्फोट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माझी बायको सोशल मीडियावर अॅडिक्ट झाली आहे. त्यामुळे मला घटस्फोट मिळावा असा अर्ज एका नवऱ्याने केला आहे. दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयात नरेंद्र सिंग यांनी ही याचिका केली आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत त्यावर सुनावणीसाठी पुढची तारिख दिली आहे.

माझी पत्नी सोशल मीडियावरच सगळा वेळ घालवते. तिचे संसारात बिलकूल लक्ष नाही. घरातली कामेही ती करत नाही. सोशल मीडियाच्या नादात त्याकडे दुर्लक्ष करणे, तिचे नित्याचेच झाले आहे, त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे. असे नरेंद्रने न्यायालयात सांगितले.