मनहर उधास कॉन्सर्ट येत्या शनिवारी

पार्श्वगायक मनहर उधास म्हटलं म्हणजे हिंदी चित्रपटांमधील गाजलेली गाणी मनात घुमू लागतात. त्यांनी गुजराती गाणीही बरीच गायली आहेत. त्यांच्या याच हिंदी, गुजराती मधूर गाण्यांचा नजराणा प्रेक्षकांना मिळणार आहे. येत्या शनिवारी 8 जून रोजी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये सायंकाळी 7 वाजता मनहर उधास यांची कॉन्सर्ट रंगणार आहे. प्रकाश वाडेकर, पंकज शाह आणि सुनील कोठारी प्रझेंट या कॉन्सर्टमध्ये मनहर उधास एव्हरग्रीन हिंदी व गुजराती लोकप्रिय गाणी गाणार आहेत. मनहर उधास यांनी आतापर्यंत 300हून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली असून अनेक बॉलीवूड नायकांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.