
मँचेस्टर सिटी क्लबने सलग तिसऱयांदा एफए कप स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. मागील 86 वर्षांच्या फुटबॉल इतिहासात असे पहिल्यांदा घडले आहे. सिटी क्लबने एव्हर्टन संघाचा 2-0 गोलफरकाने पराभव करून आगेकूच केली.
मँचेस्टर सिटी क्लबची एव्हर्टन क्लबशी 40 वर्षांपूर्वी उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडली होती. त्यावेळीही सिटी क्लबनेच 3-1 गोलफरकाने बाजी मारली होती. यंदाच्या सामन्यात मँचेस्टर सिटी क्लबच्या इकाय गुंडोगांने 84 व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. स्पर्धेतील त्याचा हा पहिलाच गोल होय. त्यानंतर केविन डी. ब्रूयने याने 90 व्या मिनिटाला गोल करून सिटी क्लबची आघाडी 2-0ने वाढवली.
एव्हर्टन क्लबला एकही गोल करता आला नाही आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. यंदाच्या स्पर्धेत सिटी क्लबने एकही सामना गमवलेला नाही. त्यांनी 16 पैकी 15 लढती जिंकल्या असून एक लढत ड्रॉ झालेली आहे.



























































