
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक आणि व्यवस्थापक संघाचे प्रतिनिधी म्हणून नाट्यपरिषद नियामक मंडळाचे सदस्य असलेले मंगेश कांबळी यांचे कोकणकन्या एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना ह्रदयविकारचा झटका येऊन निधन झाले. मृत्युसमयी ते 63 वर्षाचे होते.
मंगेश कांबळी रेड्डी येथे घरगुती कामासाठी आले होते. काल सोमवारी संध्याकाळी सावंतवाडी येथून ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईत जायला निघाले. गाडी रत्नागिरीत येण्यापूर्वीच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकात गाडी आल्यानंतर मंगेश कांबळीना रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांच्या नातेवाईकांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. गेली अनेक वर्ष ते व्यवसायिक रंगभूमीवर सुयोग नाट्यसंस्थेत नाट्यव्यवस्थापक म्हणून काम पहात होते. ते नाट्यव्यवस्थापक संघाचे अध्यक्ष होते.























































