
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून चौथ्या टप्प्यातील दौऱ्यासाठी जरांगे सोमवारी बीडच्या अंबाजोगाई येथे दाखल झाले होते. मात्र, भाषणासाठी व्यासपीठावर उभे राहिल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांचे भाषण झालं मात्र, भाषण संपल्यानंतर त्यांना तिथल्याच थोरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

























































