आमदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही विधिमंडळात प्रवेश नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्यापासून आमदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही विधिमंडळात प्रवेश देण्यात येणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा-कॉलेजना सुट्टी नाही

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजना तूर्त सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यासाठी दोन दिवस वाट पाहून गरज भासल्यास सुट्टीचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मास्कची गरज नाही

जनतेने मास्क वापरण्याची गरज नाही. फक्त खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल घ्यावा. वारंवार हात धुवावेत. रुग्णालय कर्मचारी आणि विमानतळावरील आरोग्य तपासणी कर्मचारी यांनाच मास्कची आवश्यकता आहे आणि तो साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आयपीएलबाबत गरज भासल्यास निर्णय

आयपीएल क्रिकेट सामन्यांबाबत किचारले असता, अशी एक सूचना आहे की, प्रेक्षकांकिना हे सामने खेळकाकेत. पण अद्याप आयपीएलकडून अधिकृत असा प्रस्ताक आलेला नाही. गर्दी टाळाकी या सूचना तर आहेतच; पण त्यांच्याकडून अधिकृत प्रस्ताक आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, पुणे, नागपूर येथे प्रयोगशाळा

मुंबई, पुणे, नागपूर येथे कोरोनाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आणखीही प्रयोगशाळांची आवश्यकता असल्यास त्या वाढवण्यासंदर्भात केंद्राची परवानगी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

कोरोनासाठी 650-700 बेड – राजेश टोपे

राज्यातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र बेड ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभरातील रुग्णालयांत 650-700 बेड ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांना आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची r व्यवस्था केली आहे. केंद्र सरकारने प्रशिक्षित केलेले डॉक्टर राज्यातील डॉक्टरांना कोरोनाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रशिक्षित करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.