
सोनाली फोगट यांच्या मृत्युप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती म्हापशाचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली आहे.
23 ऑगस्ट रोजी रोजी सकाळी 9 वाजता उत्तर गोव्यातील हणजुणे येथील सेंट एंथनी हॉस्पिटलमध्ये सोनाली फोगट यांना मृतावस्थेत रुग्णालयात आणले होते, अशी माहिती रुग्णालयाने दिल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
प्राथमिक चौकशीत फोगट 22 ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या. त्या हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये रउतरल्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्याने आज पहाटे त्यांना सेंट एंथनी हॉस्पिटल रुग्णालयात हलवण्यात आले,तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
संबंधित साक्षीदारांचे पुढील जबाब नोंदवले जात आहेत असून हणजुणे पोलिसांनी गोवा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाला शवविच्छेदन तपासणीसाठी डॉक्टरांचे पॅनेल नियुक्त करण्यासाठी पत्र लिहिले आहे. पुढील तपास सुरू आहे. फोगट यांचे नातेवाईक आल्यानंतर बुधवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.





























































