LIVE: ठाण्यातील आंदोलनात समाजकंटक, आंदोलन पेटवणारे २० जण ताब्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सकल मराठा क्रांती मोर्चाने आज बुधवारी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड बंदची हाक दिली आहे. दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज सुरू असलेल्या बंदचे सारे अपडेट पुढे वाचायला मिळतील.

पाहा Live: राज्यभरातील बंदचे अपडेट

  • नांदेडमध्ये छावा संघटना जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी शहरातील महाराजांच्या पुतळ्याजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला

nanded-punjabrao

  • मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील बंदही मागे
  • मराठा क्रांती मोर्चाची मुंबईत पत्रकार परिषद, मुंबईतील बंद स्थगित

  • धुुळ्यात मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, जितेंद्र जांभळे असं त्या तरुणांचं नाव
  • जुना मुंबई पुणे महामार्ग बंद
  • नवी मुंबईत बस सेवा बंद

kalamaboli-protest

  • बीडमध्ये आंदोलन चिघळले, आमदार लक्ष्मण पवारांच्या घरावर दगडफेक
  • साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, पोलीस अधिक्षक संदीप पाटील जखमी
  • जाळपोळीमुळे सायन पनवेल महामार्ग बंद

kalamboli-protest-11

  • आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, हवेत गोळीबार केला

  • कळंबोलीत आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक. पोलिसांच्या तीन गाड्या पेटवल्य
  • आंदोलकांचे कल्याण तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

kalyan-protest

  • मानखुर्दमध्ये आंदोलकांनी बस पेटवली

  • ठाणे वाशी सेवा बेमुदत बंद
  • ऐरोलीत मराठा आंदोलकांचा रेल रोको
  • साताऱ्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण
  • संभाजीनगरात आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक
  • सायन स्थानकाजवळ मराठा आंदोलकांचे रस्त्यावर झोपून आंदोलन
  • जयसिंगपूरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

jaysingpur-protest

  • विरारमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. जबरदस्तीने दुकानं बंद केली. विरार रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त
  • नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण.. आंदोलक रस्त्यावर.. वन विभागाची जिप जाळली..
  • चेंबूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक, पूर्व द्रुतगती मार्ग रोखला

    नगर जिल्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलन हिंसक वळण, आंदोलक रस्त्यावर, वन विभागाची जीप जाळली

  • नाशिक रोडवर आंदोलक आक्रमक, एटीएमची तोडफोड
  • वाशिममध्ये तरुणाचे अनोखे आंदोलन, टॉवरवर चढून केली मराठा आंदोलनाची मागणी
  • घणसोली रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखली
  • नवी मुंबईतील वाशी येथे आंदोलकांचा रास्ता रोको

  • नाशिकमधील गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांचे फोटो हातात घेऊन आंदोलक पाण्यात उतरले, २० कार्यकर्ते ताब्यात
  • नालासोपाऱ्यात आंदोलकांचा रास्ता रोको, तीन किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या
  • ठाण्यात वर्तक नगर भागात टीएमटीची बस फोडली
  • ठाण्यात आंदोलकांनी लोकल अडवली

  • दादर शिवाजी मंदिर नाट्यगृहाबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

shivaji-mandir-1

  • ठाणे येथे आंदोलकांचा रास्ता रोको

maratha-kranti-morcha-thane

  • नवी मुंबई महापे येथे आंदोलकांचा रास्ता रोको, टायर्स जाळले

mahape-band

  • सांगलीत मराठा आंदोलकांचं अर्ध जलसमाधी आंदोलन, कृष्णा नदीच्या स्वामी समर्थ घाटावर आंदोलन
  • मुलुंड टोलनाक्याजवळ आंदोलकांचा चक्काजाम
  • दादर नायगाव भागात मराठा आंदोलकांनी दुकाने बंद करायला लावली
  • नगरमध्ये कडकडीत बंद, मराठा आंदोलकांची बाईक रॅली

maratha-nagar-morcha

  • वरळीमध्ये बाजारपेठ पूर्ण बंद

maratha-worli-band

  • लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी जबरदस्ती दुकाने बंद केली.

  • संभाजीनगरमध्ये आंदोलनादरम्यान विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जगन्नाथ सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
  • ठाणे स्थानकात आंदोलकांनी रेल्वे रोखली

thane-protest

  • नगर येथे कडकडीत बंद, जिल्ह्यातील बससेवा ठप्प

nashik-band

  • ठाणे मराठा आंदोलकांनी बस फोडली

  • नालासोपारा पूर्व भागात काही दुकानांची तोडफोड
  • आंदोलक ट्रॅकवर उतरले
  • ठाणे रेल्वे स्थानकांवर मराठा आंदोलकांचा मोर्चा
  • सायन पनवेल महामार्गावर आंदोलकांचा रास्ता रोको. आंदलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी
  • जोगेश्वरीजवळ आंदोलकांनी लोकल रोखली
  • ठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण, मजीवाडा येथे आंदोलकांनी टायर जाळवे

 

  • परळ शिवडी भागात आंदोलक रस्त्यावर
  • प्रभादेवी येथे मराठा क्रांती मोर्चा

  • मुंबई आणि परिसरातील शाळांना सुट्टी नाही, विनोद तावडे यांनी केलं स्पष्ट
  • मुलुंडकडून वाशीच्या दिशेने जाणारी बस सेवा ऐरोलीपर्यंत सुरू
  • नवी मुंबई: घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर (workman bus) दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशी पर्यंत बेस्टचे बस सेवा बंद
  • मुंबईमध्ये बेस्ट बस सेवा सुरळीत
  • पालघर-रायगड-नवी मुंबईत बंद शांततेत
  • मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागा, आंदोलकांची मागणी
  • ठाण्यातील आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी
  • ठाणे- तीन हात नाका येथे आंदोलकांचा मोर्चा, वाहतूक अडवली
  • बंद शांततेत सुरू, कोणताही अनुचित प्रकार नाही
  • मुंबईत वाहतूक व्यवस्था सुरळीत
  • सकल मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई-ठाणे-पालघर-रायगडमध्ये बंदची हाक

summary : Mumbai Thane Bandh Jogeshwari Rail Roko Maratha Kranti Morcha Western Central Railway