
आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मराठा, ओबीसी समाजात कुठलाही वाद नाही. आरक्षण प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत जास्त बोलता येणार नाही. मात्र आम्ही दोघेही आरक्षणासाठी एकत्रित लढणार आहोत, एकमेकांना जास्तीत जास्त ताकद देणार आहोत, असे आज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले.
संपूर्ण बहुजन समाज एका छताखाली आणण्याचेच प्रयत्न सतत सुरू आहेत. 6 मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी आहे, त्यानिमित्त त्यांचे विचार जगभर पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या भुजबळ फार्म येथे सोमवारी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी छगन भुजबळ यांची भेट घेवून चर्चा केली. यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.






























































