कोर्टात टिकलेले मराठा आरक्षण हे युती सरकारचे फलित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  माजलगाव

जातीच्या राजकारणाचा खेळ लोकसभेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात खेळला जात असून मतपेटीच्या गोळा बेरजेत जात आडवी आणणाऱ्याना कोर्टात टिकलेले आरक्षण व आरक्षणामुळे मराठा समाजाला होऊ लागले फायदे हे  सरकारचे फलित असून ते विरोधकांना का दिसत नाही असा सवाल बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी उपस्थित केला. तसेच ज्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीच केले नाही ते आता निवडणुकीच्या निमित्ताने जात आडवी आणून आपल्या नैतिक अधःपतनाचे प्रदर्शन करीत आहेत ज्यांच्या डोळ्यात जातीचं कुसळ गेलेलं आहे त्यांना विकासाचं मूसळ कसं दिसल असाही सवाल नाईकनवरे यांनी केला
भाजप-शिवसेना युतीच्या बीड लोकसभा उमेदवार  प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी  मनुर येथील बैठकी वेळी बोलतं होते या वेळीं आ. आर.टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे, हनुमान कदम, नितीन काळे आदी उपस्थित होते.

नाईकनवरे  म्हणाले मराठा समाजाला  आरक्षणाचा होत असलेला फायदा काहींना चांगलाच जिव्हारी लागत असल्याने युती शासनाने दिलेले आरक्षण चुकीचे असल्याचा कांगावा करीत मराठा युवकांची दिशाभूल करीत  जातीचे विष पेरलं जात आहे. अशा चुकीच्या अफवाना मराठा समाज भीक घालणार नाही, तसेच जातीचं आकुंचन करणाऱ्या विरोधकांना कितीही खेटे घातले तरी जाती ह्या किती प्रसारीत झाल्या आहेत हे डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या विजयातून दिसून येईलच असा विश्वास नितीन नाईकनवरे यांनी व्यक्त केला.