
मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावोगावी बंदी केली आहे. तरीही आज पंढरपुरात आलेले मिंधे गटाचे सांगोलाचे आमदार शहाजी पाटील यांचा आंदोलकांनी दुचाकीवरून विश्रामगृहापर्यंत पाठलाग करत त्यांना पंढरपूरबाहेर हाकलले. या वेळी संतप्त आंदोलकांना शांत करण्यासाठी आमदार पाटील यांनी हात जोडले, पाया पडतो म्हणाले, तरीही आंदोलकांनी ऐकले नाही. आमदार पाटील यांनी गाडी विश्रामगृहाकडे वळवली. त्यामुळे आंदोलकांचा पारा चढला. आंदोलकांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. विश्रामगृहापाशी आमदार पाटील यांना खाली उतरू न देताच पंढरपूरच्या बाहेर हाकलले.






























































