अमृता पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झी स्टुडिओज निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटातील अजून एक अत्यंत महत्त्वाचे आणि ताकदीचे पात्र म्हणजे सोनाबाई देशपांडे यांचे. खंबीर सोनाबाईंची भूमिका बहुगुणी अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. अमृताने अनेक चित्रपटांतून एकापेक्षा एक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून काwतुकाची थाप मिळवली आहे. मात्र, ‘हर हर महादेव’ हा अमृताचा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. यावेळेस ती करारी अशा सोनाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मावळमधील स्त्र्ायांचा अभिमान म्हणजे सोनाबाई. प्रेमळ तरी वेळ पडता पतीचा कान पिळणाऱया अशा सोनाबाईंची भूमिका निभावणे काही सोपे नाही. अशा एका वेगळय़ा भूमिकेत अमृताला पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. अभिजित देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांची आहे. येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.