देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मात्र मराठीलाच उपेक्षित रहावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीच आता ‘मराठी बटालियन सामाजिक संस्थे’ने ‘मिशन मराठी’ हे नवे मिशन हाती घेतले आहेत. अध्यक्ष नंदकुमार वरणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था स्थापन करण्यात आली असून यात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
मराठी बटालियन सामाजिक संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या मिशनमध्ये मराठीबाबतचे शासनाचे धोरण, घेतलेले निर्णय हे शाळा, महाविद्यालये तसेच राज्य व पेंद्रीय निमशासकीय कार्यालये, खासगी उद्योगधंदे व का@र्पोरेट कार्यालयापर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्याबाबतची अंमलबजावणी करण्यास भाग पडण्यासाठी या विशेष मिशनची सुरुवात करण्यात आली आहे.
या मिशनअंतर्गत मराठी भाषेतील सर्व जाती, जमाती, बारा बलुते, पंथ, गोत्र, पुळ, समाज इत्यांदीना सोबत घेऊन कोणत्याही पक्षाची बांधिलकी न ठेवता सर्व प्रकारांच्या मराठीजनांना एकत्रित करण्यासाठी हे मिशन हाती घेण्यात आले आहे.
कोण होऊ शकतो सहभागी
‘मिशन मराठी’साठी ज्या मराठी भाषिकांना मराठी भाषेबद्दल ओढ, आस्था, प्रेम व स्नेह, आदर आहे अशांचे स्वागत केले जाणार आहे. त्याशिवाय ज्यांच्या अंगी विविध कलागुण, माहिती अधिकार, संगणकीय कामकाज, सोशल मीडियाबद्दलचे ज्ञान आहे असे युवक-युवतीदेखील सहभागी होऊ शकतात.
कसे होणार सहभागी
‘मिशन मराठी’साठी खालील क्रमाकांवर संपर्प साधण्याचे आवाहन अध्यक्ष नंदकुमार वरणकर यांनी केले आहे. ज्यात नंदकुमार वरणकर 9869008483, अनंत दाभोळकर – 9833860942, रमेश ठाकरे – 9082051659 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मराठी बटालियन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.































































