पडद्याआडून – सांगा कसं जगायचं? व्यवस्थेला विचारलेला बेधडक सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

मानवी आयुष्यातील संघर्ष हा सनातन आहे. कधी तो स्वतःविरुद्ध असतो, कधी समाजाविरुद्ध तर कधी व्यवस्थेविरुद्ध. माणसाच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांना पर्याय सुचविणारी अनेक नाटपं यापूर्वी येऊन गेली आहेत. काही नाटपं प्रश्न पाडतात तर काही त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करतात. भद्रकाली प्रॉडक्शन्सचं हीरक महोत्सवी नाटक ‘सांगा कसं जगायचं?’ हे केवळ एक नाटय़प्रयोग राहत नाही, तर तो प्रेक्षकांच्या विवेकबुद्धीला हादरा देणारा अनुभव ठरतो. आजवर रंगभूमीवर अनेक सामाजिक, कौटुंबिक आणि कायदेशीर संघर्ष पाहायला मिळाले; पण एका विवाहित स्त्राrच्या भावनिक हक्कांचा प्रश्न इतक्या थेट आणि धाडसी पद्धतीने मांडण्याचं साहस फार कमी नाटकांनी केलं आहे. हे नाटक त्या अर्थाने चाकोरी मोडतं आणि थेट व्यवस्थेलाच जाब विचारतं.

नाटकाची सुरुवात होते ती हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये. अंजली दळवी ऊर्फ अंजू हिचा नवरा अक्षय दळवी एका रस्ता अपघातानंतर कोमात आहे. अंजू एकटीच तिथे आहे आणि इतर कोणीच नातेवाईक किंवा मित्रमंडळी तिच्यासोबत नाहीत. मृत्यूशी झुंज देणाऱया नवऱयाजवळ बसलेल्या अंजूभोवती डॉक्टर भागवत, सिस्टर पुलकर्णी आणि नंतर येणारी वकील स्नेहा पाटील यांच्या संवादातून कथानक उलगडत जातं. सुरुवातीला ही कथा एक नेहमीची ‘हिट अँड रन’ केस वाटते; पण अंजूची खरी मागणी समोर येते आणि नाटक अचानक एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतं. त्या क्षणी प्रेक्षक अक्षरशः सुन्न होतात. आपला नवरा मृत्यूशी झुंज देत असताना अशी कोणती जगावेगळी मागणी अंजू करते, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो.

पात्राच्या संवादातून हळूहळू उलगडत जाणारे हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. स्त्राrने दिलेला कायदेशीर लढा आणि तिचा विजय आपण याआधी अनेकदा पाहिलाय. पण कायदा आणि समाज संपूर्णपणे विरोधात असतानाही केवळ नवऱयाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सगळ्यांच्या विरुद्ध ठाम उभे राहून दिलेला हा लढा निव्वळ संस्मरणीय आहे. हा केवळ एक लढा नाही तर ते संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध एका अबलेने पुकारलेलं युद्ध आहे. ‘काही युद्धं ही जिंकण्यासाठी लढायची नसतात, तर शेवटपर्यंत मैदानात कोण टिपून राहिलं हे दाखवण्यासाठी ती लढायची असतात,’ हे महत्त्वाचं वाक्यच या नाटकाचा आत्मा आहे.

लेखक डॉ. सत्यजित खारकर यांच्या मूळ संकल्पनेतच मोठं धाडस आहे. लग्न, प्रेम, भावनिक नातं, वैद्यकीय नैतिकता, कायदेशीर मर्यादा आणि व्यक्तिस्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी एकाच वेळी भिडतात. हे नाटक कोणत्याही एका बाजूने न्यायनिवाडा करत नाही; उलट प्रेक्षकांनाच विचार करायला भाग पाडतं. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी हा गंभीर विषय अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आहे. नाटक पुठेही उपदेशात्मक होत नाही. कथानकाचा ताण कायम ठेवत त्यांनी पात्रांच्या माध्यमातून हलक्याफुलक्या क्षणांचीही योग्य पेरणी केली आहे. त्यामुळे प्रेक्षक भावनिकदृष्टय़ा गुंतून राहतात. वैद्यकीय आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास, हा जाणवेल इतक्या बारकाईने नाटकाची मांडणी केलेली आहे.

अंजूच्या भूमिकेत स्पृहा जोशी हिने अक्षरशः जीव ओतला आहे. तिच्या डोळ्यांतला आक्रोश, संवादातील तडफ आणि देहबोलीतील असहायता प्रेक्षकांच्या मनाला भिडते. काही प्रसंगांत ती शब्दांशिवायही खूप काही बोलून जाते. स्वानंदी टिकेकर हिने साकारलेली वकील स्नेहा पाटील हीदेखील तितकीच प्रभावी. तिच्या भूमिकेतला आत्मविश्वास, कायद्याचा ताठा आणि आतल्या स्त्राrमनाचा गोंधळ तिने अचूक पकडला आहे. तिचं व्यक्तिमत्त्व भूमिकेला अनुरुप आहे. निषाद भोईर (अक्षय) ही एक गूढता राखून ठेवणारी व्यक्तिरेखा आहे, जी कथेची गरज आहे. अमेय बर्वे (डॉ. भागवत), श्रद्धा पोखरणकर (सिस्टर पुलकर्णी) आणि सागर आठलेकर (रोकडे) यांनी आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलाय. त्यांना हा गंभीर विषय पुढे नेण्यासोबतच नाटकात रिलीफ निर्माण करण्याचे कठीण काम दिलेय जे ते तिघेही चोख पार पाडतात. पहिल्या अंकातील हॉस्पिटलमधला वावर आणि दुसऱया अंकातील स्नेहाचे घर दिमाखदार नेपथ्यातून उभं केलंय. मध्येच कोर्टरूमचा छोटासा प्रवेश दाद घेऊन जातो. नाटकाची तांत्रिक अंगे जमून आली आहेत. नाटकाचा शेवट हा त्याचा सर्वात मोठा ‘हायलाइट’ म्हणावा लागेल. दिग्दर्शकाने दोन प्रमुख पात्रांना दिलेली अनपेक्षित मूव्हमेंट ही केवळ नाटय़मयता देत नाही तर आपल्या विचारांना वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. स्पॉयलर द्यायचा नाही म्हणून काही घटना आणि प्रसंग यांचा उल्लेख इथे मुद्दामहून टाळलाय, पण हे नाटक अनुभवल्यानंतर प्रेक्षक स्तब्ध होतात.

भद्रकाली प्रॉडक्शन्सने नेहमीच वेगळे विषय हाताळण्याची परंपरा जपली आहे आणि निर्माते प्रसाद कांबळी यांनी ती इथेही कायम ठेवली आहे. ‘सांगा कसं जगायचं?’ हे नाटक केवळ मनोरंजन करत नाही, तर अस्वस्थ करतं, प्रश्न विचारतं आणि व्यवस्थेच्या मर्यादा अधोरेखित करतं. ताकदीचं लेखन, प्रभावी अभिनय आणि धाडसी विषयामुळे हे नाटक नक्कीच ‘मस्ट वॉच’ ठरतं. तुमची जबरदस्त भावनिक गुंतवणूक असलेल्या गोष्टीसाठी, प्रसंगी समाजाच्या आणि कायद्याच्या विरोधात जाऊन कसं लढायचं? आणि कसं जगायचं? हे शिकवणारं आणि सप्रमाण दाखवणारं हे एक जबरदस्त नाटक आहे.

मूळ लेखन ः डॉ. सत्यजित खारकर

दिग्दर्शन  नीरज शिरवईकर

कलाकार ः स्वानंदी टिकेकर, निषाद भोईर, अमेय बर्वे, सागर आठलेकर, श्रद्धा पोखरणकर आणि स्पृहा जोशी.

संगीत ः विजय गवंडे

नेपथ्य ः संदेश बेंद्रे

प्रकाशयोजना – श्याम चव्हाण

वेशभूषा ः श्वेता बापट

निर्माता ः भद्रकाली प्रॉडक्शन्स आणि श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी

व्यवस्थापन ः श्रीकार पुलकर्णी

छायाचित्र सौजन्य ः भद्रकाली