‘रौंदळ’ चित्रपटातील ‘भलरी…’ गीत प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या गाजलेल्या चित्रपटानंतर ‘रौंदळ’मध्ये प्रेक्षकांना अभिनेता भाऊसाहेब शिंदेचा नवा अवतार पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील भलरी हे नवेकोरे गाणे भेटीला आले आहे. सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार  म्हणजेच ‘भलरी ‘, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे.
भलरीला आपल्या साहित्यात ‘श्रमगीत’ म्हणूनही विशेष दर्जा आहे. हा लोप पावत चाललेला गीतप्रकार ‘रौंदळ’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात
आला आहे. ‘घे गडय़ा घे….भलरी घे…’ असा या गाण्याचा मुखडा आहे. हे प्रसंगनुरूप गाणं गीतकार बाळासाहेब शिंदे यांनी लिहिले असून संगीतकार हर्षित-अभिराज आहेत. गणेश चंदनशिवे, वैशाली माडे आणि हर्षित-अभिराज यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चांद लावले आहेत. गजानन  पडोळ दिग्दर्शित हा चित्रपट 3 मार्च 2023 रोजी  भेटीला येणार आहे.