इंटरनेटने आयुष्यातील जिव्हाळा संपला – झुकेरबर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘इंटरनेटमुळे जग जवळ येतंय पण आम्ही नात्यांतील जिव्हाळा गमावलाय, अशी हुरहूर फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. मार्कने म्हटलेय की, इंटरनेटद्वारे आपल्या कक्षा रुंदावल्यात तसेच संस्कृती आणि संधी दूरपर्यंत पोहोचली आहे, मात्र अशा मोठय़ा समुदायात राहण्यात एक मोठे आव्हान आहे.’ झुकेरबर्ग यांनी लिहिलंय, मी एका लहानशा गावात लहानाचा मोठा झालो. त्यावेळी मी स्वत:ला वेळ देत होतो, मात्र आता असंख्य लोकांच्या समूहात राहूनही मी माझी स्वतŠची वेगळी अशी ओळख शोधत आहे. मला माझ्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला वेळ द्यायचाय, अशी खंत मार्कने व्यक्त केली. माझं आयुष्य खूप सार्वजनिक झाले आहे. मला माझ्या माणसांना वेळ द्यायचाय तो मार्क झुकेरबर्ग म्हणून नाही तर एक माणूस म्हणून.