
देवरुख अखंड महाराष्ट्रातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. मार्लेश्वर देवस्थानचे ट्रस्टी सुनील लिंगायत, गिरिजा देवीचे मानकरी बापू शेट्ये, काका शेट्ये, सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावर्षी यात्रोत्सव होणार नसून केवळ धार्मिक विधी ते ही मानकरी आणि निवडक लोंकांच्या उपस्थितीत होणार आहेत. यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे.
जादा एस टी फेऱ्या किंवा अन्य खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. 13 ते 15 जानेवारी या कालावधीत मार्लेश्वरमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याची दखल घेऊन भाविकांनी मार्लेश्वरला येऊ नये आणि विनाकारण गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
























































