साप्ताहिक ‘मार्मिक’चा 64वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि ‘मार्मिक’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर, दादर इथे दिमाखदार सोहळ्यात रंगला. यावेळी व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी गेल्या चार वर्षांत साकारलेल्या ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठचित्रांचे ‘नवे फटकारे’ हे व्यंगचित्र प्रदर्शनही यनिमित्ताने शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात भरवण्यात आले होते. यावेळी मार्मिकच्या व्यंगचित्रांची पाहणी करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत पत्नी सौ.रश्मी ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई दिसत आहेत.
(सर्व फोटो – रूपेश जाधव)