भोस्ते येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

खेड तालुक्यातील भोस्ते येथे राहणारी विवाहिता आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाली असल्याने खळबळ उडाली आहे. सरोज यादव (२८) असे विवाहितेचे नाव असून ती आपला ६ वर्ष वयाचा मुलगा दक्ष आणि २ वर्षाचा मुलगा टायगर या दोघांनाही घेऊन बेपत्ता झाल्याचे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

८ जुलै २०१८ रोजी सरोज ही आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडली. ती कुठे जात आहे याबाबत तिने घरी कुणाला काहीही सांगितले नाही. सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुठेच न आढळून आल्याने अखेर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तीचे पती इंद्रजीत यादव यांनी खेड पोलिसात दिली. खेड पोलिस मुलांसह बेपत्ता झालेल्या विवाहितेचा शोध घेत आहेत.