
बालदिनानिमित्त नेहरू सेंटर, वरळी येथे 14 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेली ‘मस्तीची शाळा’ बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. नृत्य, गायन, अभिनय, वादन, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला आणि जादू अशा विविध कलांच्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी मुलांना मिळणार आहे. 8 ते 15 वर्षे वयोगटातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांना या कार्यशाळांमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत विविध विषयांतील तज्ञ मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे सादरीकरण होईल. मर्यादित जागांमुळे नावनोंदणी सुरू असून इच्छुकांनी प्रकाश पवार (9820356766), अक्षय भोसले (7208757589) किंवा नंदकुमार पाटील (9869008805) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. पालकांनी आपल्या पाल्याच्या आवडीच्या कार्यशाळेसाठी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


























































