गणितातील समस्यांकरिता ‘मॅथ सॉल्व्हर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक विद्यार्थ्यांना किचकट वाटणारा गणित हा विषय सहजसोप्यारितीने कळावा यासाठी ब्रेन लीतर्फे ‘मॅथ सॉल्व्हर’हा ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हे नवे टूल 24/7 उपलब्ध असून युझर्सना गणितातील सर्वात जटील समस्यांचे निराकरण करण्यात मदत मिळणार आहे.

ब्रेन ली मॅथ सॉल्व्हरद्वारे एखाद्या जटील गणिताचा फोटो किंवा मॅन्युअली डिव्हाईसच्या टचस्क्रीनवर इक्वेशन लिहून पाठवल्यास त्यावर तत्काळ टप्प्याटप्प्यानुसार मार्गदर्शन मिळते. एआयद्वारे समस्येचे त्वरित विश्लेषण होते आणि तपशीलवार स्पष्टीकरण देऊन सोल्युशन प्रदान केले जाते. अधिक आकलनासाठी ग्राफिकल/ व्हिज्युअल सादरीकरणाद्वारे मदत केली जात असल्याची माहिती राजेश बिसाणी यांनी दिली.