माऊली दिंडीचे ४ जुलै रोजी प्रस्थान

94
वारकरी लक्षवेधी चाल खेळताना

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

आठशे वर्षांची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली माता-पितासहित भव्य दिंडीचे पंढरपूरकडे ४ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. कैवल्यमूर्ती ब्रह्मलीन विष्णू महाराज कोल्हापूरकर (गुरुजी) यांच्या आशीर्वादाने हा सोहळा होणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.

दिंडी सोहळा ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता प्रस्थानाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. प्रस्थानानंतर आपेगाव, बोरगाव, बोधेगाव, दराडे वस्ती, बोरगाव संस्था चकला, आर्वी, नागरेची वाडी, नाळवंडी, पाटोदा, पारगाव घुमरे, जायभायवाडी, खर्डा, आंबी, कंडारी, परंडा, भागचंद धोका, आरण, मेंढापूरमार्गे २२ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. दिंडीदरम्यान हरिपाठातील ‘हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसि सुलभ रामकृष्ण’ या सोळाव्या अभंगावर दररोज पाठचिंतन होणार आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ह.भ.प. भानदास महाराज कोल्हापूरकर (भाऊ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री विष्णू माऊली मुक्ताई साधक संस्था व जिजाऊ गोमाता धाम चितेपिंपळगाव, ज्ञानेश अध्यात्म विद्या संस्था विद्यार्थी, विनायक महाराज आष्टेकर, भगवान महाराज दातखिळ, शहादेव अण्णा, शंकरअण्णा पठाडे, अप्पासाहेब चौधरी, राजू चोरडिया, सुनील पठाडे, कल्याण गावंडे, सुरेश गावंडे आदींनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या