मयांक अग्रवालचे वन डे संघात पदार्पण, शिखर धवनच्या जागेवर ‘टीम इंडिया’त निवड

431

हिंदुस्थानचा कसोटीपटू मयांक अग्रवाल वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत शिखर धवनच्या जागेवर मयांकची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. धवन अद्यापि गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नसल्यामुळे संघ निवड समितीने मयांकला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘टीम इंडिया’ 15, 18 आणि 22 डिसेंबरला विंडीजविरुद्ध 3 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन डे मालिका सुरू होण्यापूर्वी शिखर धवन दुखापतीमधून सावरेल अशी शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे शिखर धवनच्या जागेवर मयांक अग्रवाल याला संधी मिळाली असल्याचे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱयाने नाव न घेण्याच्या अटीवर ‘पीटीआय’ला ही माहिती दिली.

हिंदुस्थानचा संभाव्य एकदिवसीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

आपली प्रतिक्रिया द्या