Mega Block – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत डाऊन जलद गाड्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहचतील.

सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांबे देतील, मात्र गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.

ठाण्याहून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान नियोजित थांबे देतील. त्यानंतर त्या माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वेवरील कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाउन मार्गावरील गाड्या सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत रद्द केल्या जातील. सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल पर्यंतच्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत रद्द केल्या जातील. पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी मुंबई पर्यंतच्या गाड्या सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 पर्यंत रद्द केल्या जातील.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी या मार्गांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करू शकतील.