
जेनेरिक आधार ही वेगाने वाढणारी देशातील फार्मा कंपनी आहे. ही कंपनी आता औषधी उत्पादने मोठ्या प्रमाणात लाँच करत आहे. या कंपनीची एकूण एक हजारपेक्षा जास्त उत्पादने आहेत.इनोव्हेटिव्ह व्हेंचरची सुरुवात 16 वर्षांचे तरुण अर्जुन देशपांडे यांनी केली. त्यांनी ठाणे येथून 2018 मध्ये जेनेरिक आधारची स्थापना केली. या उपक्रमाला प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनीही पाठिंबा दिला आहे. जेनेरिक आधार हे एक फार्मा व्हेंचर आहे जे औषधांवर 80 ते 90 टक्क्यांपर्यंत सर्वाधिक सूट देते . ते ग्राहकांसाठी फायद्याचे आहे.
मेगा लाँचमध्ये पुढील उत्पादने आहेत
- प्रोटीन पावडर + डीएचए (स्वॅप्रो डीएचए): हे पौष्टिक आहे. प्रथिने पावडर वापरल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि स्नायूंना टोन करण्यास मदत होते.
- शतावरी (व्हेनिला फ्लेवर) – गर्भवती आणि स्तनदा महिलांसाठी हे पोषक आहे. वनस्पती अर्क शतवारीतून अतिरिक्त नैसर्गिक घटक देते.
- विटामीन पावडर – व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियम आणि खनिज यात आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य चांगले राहते.
- सोया प्रथिने – स्नायू आणि ऊती तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. ही प्रथिने उर्जेचा मुख्य स्त्रोत आहेत आणि विविध जैविक प्रक्रियांमध्ये आवश्यक भूमिका असते. वजन कमी करण्यास आणि स्नायूंना टोन करण्यास मदत होते.
- प्रथिने पावडर शुगर फ्री (स्वास्थ्या प्रोटीन एसएफ) – प्रथिने रक्तदाब कमी करते या शुगर फ्री प्रथिने पावडर टाइप 2 मधुमेहाचा उपचार करण्यासाठी मदत करू शकतात.
यासारखी नवीन उत्पादने लाँच करण्यात येणार आहेत. ही औषधे 16 राज्यांमधील 130 पेक्षा जास्त शहरांमध्ये पोहचली आहेत. कोरोना संकटात अर्जुन देशपांडे यांची जेनेरिक आधार कंपनी देशभरात व्यवसाय, करिअर आणि उद्योजकता संधी निर्माण करत आहे. जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे म्हणाले “कार्डिओलॉजी, अँटी डायबेटिक, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी, न्युट्रस्यूटिकल्स, अँटी-बायोटिक्स, ऑन्कोलॉजी, पेडियाट्रिक्स, त्वचाविज्ञान, जठरोगशास्त्र यासारख्या विविध प्रकारांच्या सुमारे 1000 पेक्षा जास्त उत्पादनांचा पोर्टफोलिओ घेऊन देशातल्या 16 राज्यांमधील 130 शहरांपर्यंत पोहोचल्याचा मला अभिमान वाटतो. जेनेरिक आधार विविध श्रेणीतील औषधांवरच सवलत देत नाही तर प्रत्येक नागरिकांना आमच्या फ्रँचायझीद्वारे नोकरीची संधी आणि उद्योगाची संधी देतो. आम्ही सर्वांना जेनेरिक औषधे निवडण्याचे आवाहन करत आहोत. जे दर्जेदार आहेत, प्रभावी आहेत.
























































