मेघना साने यांचे ‘मराठी सातासमुद्रापार’ पुस्तक प्रकाशित 

ग्रंथालीच्या वतीने मेघना साने यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आले. यावेळी माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ आणि कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ उपस्थित होत्या. यावेळी अभिनेते जयंत सावरकर, लेखिका मोनिका ठक्कर, विवेक मेहेत्रे, मुखपृष्ठकार सतीश भावसार आणि पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱया अनुराधा नेरूरकर यांचा सत्कार केला. आकाशवाणीचे भूपेंद्र मिस्त्र्ााr, कोमसाप मुंबई उपनगरचे माजी अध्यक्ष शिवाजी गावडे, कवी कमलाकर राऊत, चित्रकार रामदास खरे, कवी विकास भावे उपस्थित होते.