भाजपने जम्मू कश्मीरचा अफगाणिस्तान केला, महबुबा मुफ्तींची भाजपवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबुबा मुफ्ती यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजपने जम्मू कश्मीरचा अफगाणिस्तान केला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. सोमवारी एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

या पत्रकार परिषदेत बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू कश्मीरची स्थिती सध्या पॅलेस्टाईनपेक्षा गंभीर आहे. पॅलेस्टाईनमध्ये कमीत कमी लोक एकमेकांशी बोलू शकतात. पण, इथे मात्र त्याहून गंभीर परिस्थिती आहे. इथे लोकांची घर पाडण्यासाठी बुलडोझर फिरवला जात आहे. राज्यभरात अतिक्रमणविरोधी मोहीमेअंतर्गत गरीब आणि अल्पभूधारकांची घरं पाडली जात आहेत. त्यामुळे कश्मीर अफगाणिस्तानहून वाईट चालला आहे, अशी टीका मुफ्ती यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या की, मी या देशातील सर्व विरोधी पक्षांना आवाहन करते. भाजपकडून कश्मीरमध्ये सुरू असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करू नका. भाजप त्यांच्या प्रचंड बहुमताच्या बळावर संविधानाची पायमल्ली करत आहे, असा हल्लाबोल मुफ्ती यांनी केला आहे.