
सामना प्रतिनिधी । मेहकर
एस टी महामंडळाच्या मेहकर बस स्थानकाचे नुतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामाचे भूमीपूजन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ संजय रायमूलकर होते. या सुशोभीकरणासाठी तब्बल 3 कोटी 95 लाख रुपये खर्च येणार आहे.
खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नातून मेहकर बस स्थानकाच्या नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी तीन कोटी 95 लाख रुपये इतका भरीव निधी प्राप्त झाला आहे. बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे बांधकाम, सहा आकर्षक फलाट बांधणी, प्रतिक्षालय, स्थानक प्रमुख कार्यालय, वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण व पासेस कक्ष, हिरकणी कक्ष, उपहारगृह, बुकस्टॉल इत्यादी उभारण्यात येणार आहे.
आज सकाळी खासदार प्रतापराव जाधव,आमदार डॉ संजय रायमूलकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. सृष्टी कंस्ट्रक्शन देऊळगाव राजा यांच्या मार्फत हे काम केले जाणार आहे. विभाग नियंत्रक संदीप रायलवार ,आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.वाढदिवसानिमित्त आमदार डॉ रायमूलकर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव,न पा उपाध्यक्ष जयचंदजी बाठीया, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश वाळूकर,माजी उपजिल्हा प्रमुख दिलीपबापू देशमुख, कंत्राटदार अंबादास सास्ते ,विनोद देशमुख,नगरसेवक रामेश्वर भिसे,विकास जोशी,अक्काताई गायकवाड,गणेश लष्कर , ओम सौभागे,अशोक पसरटे, संचालक सुरेशराव काळे ,उपतालुका प्रमुख समाधान साबळे,एस टी चे विभागीय अभियंता अजय नाईक,कंत्राटदार श्री बुरकुल ,वाहतूक निरीक्षक भास्कर लामकाणे ,किसन बळी,संजय मापारी,लेखाकार गजानन बागल , समाधान सोनुने,प्रवीण तांगडे,विलास चव्हाण ,अंकुश शिंदे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.बस स्थानकाचे नुतनीकरणाचे सर्व काम आकर्षक व दर्जेदार करण्याच्या सूचना यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागेश कांगणे यांनी केले .
































































