सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागावर चाहते झाले निराश, सोशल मीडियावर केले ट्रोल

816

सेक्रेड गेम्स या गाजलेल्या वेबसिरीजचा दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तब्बल एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 15 ऑगस्टला सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला. रात्री 12 वाजता दुसरा भाग रिलीज झाल्यानंतर ती पाहण्यासाठी चाहते नेटफ्लिक्सवर तुटून पडले. रिलीज काही तासातंच तमिळ रॉकर्सने ही वेबसिरीज लिक देखील केली.

मात्र वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या या वेबसिरीजने चाहत्यांची मात्र निराशा केली आहे. पहिल्या भाग हा जबरदस्त होता तर त्या तुलनेत दुसऱ्या भागाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत असे चाहत्यांचे म्हणने आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या वेबसिरीजला ट्रोल करण्यात येत असून ट्रोलर्सच्या मिम्सने धुमाकूळ घातला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या