
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे गुरे चरवायला गेलेल्या ग्रामस्थावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
जनार्दन काशिनाथ चंदूरकर (55, रा. मेर्वी जांभूळआडी) हे सकाळी गावाजवळील जंगलात गुरे चरण्यासाठी गेले होते. गुरे चरवून परत येत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यातून सुटण्यासाठी त्यांनी धडपड केली. बिबट्याने चंदूरकर यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात ते बिथरून गेले. हल्ला करून बिबट्या पिल्लांच्या दिशेने जाताच चंदुरकर यांनी पळ काढला ते मिळाली आणि ते काही अंतरावर असलेल्या शेत घरात पळाले.
शेत घराच्या टेरेसवर जाऊन त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले.घटना समजताच शिवसेनेचे विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी घटनास्थळी जाऊन चंदूरकर यांची विचारपूस करत त्यांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले.






























































