एकदा चार्ज केल्यावर 419 किमी धावणार ही कार, एमजी मोटर इंडियाची नवी ‘ZS EV 2021’ लॉन्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
MG ZS EV 2021

एमजी मोटर इंडियाने नवी ‘ZS EV 2021’ ही 20.99 लाख रुपये किंमतीत (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) लॉन्च केली आहे. या अपडेट व्हर्जनमध्ये सर्वोत्तम वर्गात 44.5 kWh हाय टेक बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर 419 किमी धावते. नव्या 215/55/R17 टायर्ससह सुसज्ज वाहन आणि बॅटरी पॅक ग्राऊंड क्लीअरन्स अनुक्रमे 177 मिमी व 205 मिमी एवढा आहे. ( MG ZS EV 2021 launched: Price, specs, and other highlights )

आपल्या भागीदारांसह देशभरात चार्जिंग इकोसिस्टिमचा विस्तार करत ‘ZS EV 2021’ ही आता 31 शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जानेवारी 2020 मध्ये सुरुवातीला ही कार 5 शहरांमध्ये लाँच करण्यात आली होती.

एमजी ‘ZS EV 2021’ ही 143 पीएस पॉवर आणि 350 एनएम टॉर्सह येते तसेच ती 0 ते 100 kmph अंतर 8.5 सेकंदात पोहोचू शकते. ही कार एक्साइट व एक्सक्लुझिव्ह प्रकारात उपलब्ध आहे. हिंदुस्थानातील पहिली पूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्ही म्हणून तिच्यावर एमजीचे जागतिक संकेत असून त्यात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत. या सुविधांमध्ये पॅनोरमिक सनरुफ, 17 इंच डायमंड कट अॅलॉयव्हिल्स आणि 2.5 पीएम फिल्टर इत्यादींचा समावेश आहे.

झेडएस ईव्ही सोबत एमजीने आपल्या ग्राहकांना 5- वे चार्जिंग इकोसिस्टिम दिले असून घर किंवा ऑफिसमध्ये मोफत एसी फास्ट चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डीलरशिपसाठी डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन, 24×7 चार्ज-ऑन-द-गो सुविधा (5 शहरांमध्ये) व सॅटेलाइट शहर तसेच पर्यटन केंद्रांमध्ये चार्जिंग स्टेशन आहेत.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “1 वर्षाच्या खूप कमी वेळात ‘ZS EV 2021’ ही क्रांतिकारी कार लाँच करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. याद्वारे इलेक्ट्रॉनिक वाहनांप्रति आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार होतो. आमच्या ग्राहकांना मालकीचा उत्कृष्ट अनुभव मिळण्यासाठी देशभरात आमच्या इकोसिस्टिम पार्टनर्ससोबत आम्ही मजबूत चार्जिंग सुविधा उभ्या करत आहोत.”

या कारनिर्मात्याने ‘इको ट्री चॅलेंज’ देखील आणले असून याअंतर्गत झेडएस ईव्ही मालक पर्यावरणीय उपक्रमात सहभागी होऊ शकतात. याद्वारे त्यांची CO2 सेव्हिंग आणि रिअल टाइममध्ये राष्ट्रीय क्रमवारी तपासू शकतात. एमजी झेडएस ईव्ही 2021 ही एमजी ईशील्ड सोबत संरक्षित असून, याद्वारे कारनिर्माता 8 वर्षांसाठी अमर्याद किमीकरिता 5 वर्षांची मोफत वॉरंटी/1.5 लाख किमी वॉटंरी बॅटरीपॅक सिस्टिमसाठी, 5 वर्षांसाठी राउंड-द-क्लॉक रोडसाइड असिस्टन्स आणि 5 लेबर-फ्री सर्व्हिसेस दिल्या जातात.