घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीमधील विजेत्यांना घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

कोकण मंडळाने 4523 घरांची सोडत काढली होती. त्यापैकी 2176 अर्जदारांनी घरे स्वीकारली असून 514 अर्जदारांनी अजूनही स्वीकारलेली नाहीत. 1374 अर्जदारांनी घरे सरेंडर केली आहेत. घरांच्या स्वीकृतीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी अनेक विजेत्यांनी मागणी होती. त्यानुसार मुदतवाढ दिली आहे. दिलेल्या मुदतीत विजेत्यांनी घरे न स्विकारल्यास प्रतीक्षा यादी कार्यान्वित होईल.