पवई तलाव सुशोभीकरणासोबत पायाभूत सुविधा निर्माण करा! आदित्य ठाकरे यांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेल्या पवई तलावाचे सुशोभिकरण व तलावाच्या परिसरात पायाभूत सुविधांचा निर्माण करण्याची सुचना आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

भांडूप घाटकोपर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामाचा आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत आढावा घेतला.

या भागातील विविध विकासकामांचा आदित्य ठाकरे यांनी नुकताच आढावा घेतला होता. त्यानंतर या कामांना चालना मिळाली होती. त्यातील काही विकास कामांचा पुन्हा आढावा घेतला आणि ही कामे वेगाने करावी, अशा सूचना त्यांनी केली.

शहरातील काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचा प्रश्न काही नगरसेवकांनी मांडला. त्यावर उन्हाळा सुरु होण्यापुर्वी यासंदर्भात आढावा घ्या. शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही यासाठी पावले उचलण्याचे आदेश यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.

या बैठकीला परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, आमदार रमेश कोरगांवकर,  आमदार सदा सरवणकर, आमदार अजय चौधरी  महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू उपस्थित होते. वरळी-शिवडी कनेक्टर संदर्भातही आदित्य ठाकरे यांनी या मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या पुलाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.