सोलापुरात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या पोटफाडी चौकातील भाजपच्या शहर कार्यालयासमोर युवा भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे, विकास गायककाड, हुसेन बागकान, सुनील काळे हे उपस्थित होते. पंढरपुरात राष्ट्रवादीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे, ‘ओबीसी सेल’च्या जिल्हाध्यक्ष साधना राऊत उपस्थित होते.