राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे’, असे ट्विट हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या