सगळ्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी दोन दिवसांत निर्णय घेणार – विजय वडेट्टीवार

मुंबईत सगळ्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी दोन दिवसांत निर्णय घेणार अशी माहिती मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. एका ट्विटर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

ट्विटरवर एका युजरने प्रश्न विचारला होता की, अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचारी, वकील आणि महिलांसाठी लोकल सुरू आहेत. मग सामान्य माणसांसाठी लोकल कधी सुरू होणार?


त्यावर उत्तर देताना वडेट्टीवर म्हणाले की येत्या दोन दिवसांत सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, याबाबत अनेक लोकांशी आपण चर्चा केली आहे. मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल अशी विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


राज्यात लॉकडाऊन जारी केल्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. आधी फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणार्याा कर्मचार्यांससाठी लोकल सेवा सुरू होती. हळूहळू अनलॉक करताना सरकारी कर्मचारी, पत्रकार, वकील यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. नंतर महिलांनाही लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या