मिरा भाईंदर पोलिसांकडून तेलंगणा राज्यातील ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त, ड्रग्स कारखान्यात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांचा सहभाग

मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट – 4 च्या पथकांनी मागील एक महिन्यापासून तेलंगणा राज्यातील चेरापल्ली येथे एका मोठ्या ड्रग्स कारखान्यावर कारवाई करत ती उद्ध्वस्त केल आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ह आतापर्यंत सर्वात मोठी ड्रग्स कारवाई असून एम.डी. ड्रग्स बनविण्यासाठी पकडलेल्या 32 हजार लिटर केमिकल व 1 हजार किलो पावडर त्यात कच्चा माल व एम.डी. ड्रग्स यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 12 हजार कोटी असल्याची सांगण्यात येत आहे, या कारवाईमुळे ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले आहे. आतापर्यंत 12 जणांना सदरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तर या ड्रग्स फॅक्टरीच्या कारवाई बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा देत कारवाईची प्रशंसा केली आहे. सदरील ड्रग्स फॅक्टरी कारखान्यात व वितरकामध्ये अंडरवर्ल्ड गॅंग संबंधी लोकांचा समावेश असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत 8 ऑगस्ट रोजी एक परदेशी महिलेला 105 ग्राम एम.डी. ड्रग्स विकताना फातिमा शेख उर्फ मोल्ला वय 23 वर्ष ह्या बांगलादेशी महिलेला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले होते, त्यानंतर मुंबईच्या दहिसर येथून त्यांच्या वितरक साथीदाराना अटक केली होती त्यात 21 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करत अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे साथीदारांकडून 2 लाख 87 हजाराचा मुद्देमाल मिरारोड व दहिसर येथून जप्त केला होता, असे एकूण 178 ग्राम मेफेड्रोन (एम.डी.) हे अंमली पदार्थ जप्त केले होते.

पोलिसांनी आतापर्यंत सदरील गुन्ह्याच्या तपासात 10 आरोपीला ड्रग्स वितरक आरोपींना अटक केली होती व त्यानंतर पोलीस तपासात समोर आलेल्या ड्रग्स उत्पादक कंपनी ह तेलंगणा राज्यातील हैद्राबाद नजीकच्या चेरापल्ली औद्योगिक वसाहतीत केमिकल फॅक्टरी मध्ये बनत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडा व त्यांच्या पथकाने तेलंगणा राज्यात जाऊन केलेल्या तपासात आरोपी श्रीनिवास विजय वोलेटी व त्याचा साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी यांच्यासह प्लॉट क्रमांक 193 फेस क्रं. 5, चेरापल्ली, नवोदय कॉलनी, तेलंगणा राज्य या ठिकाणी अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना चालत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने 5 सप्टेंबर रोजी नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणाहून 5 किलो 790 ग्रॅम वजनाचे एमडी अमली पदार्थ तसेच अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या 35 हजार 500 लिटर रसायन आणि 950 किलो पावडर व इतर साहित्यही मिळून आले आहे. त्यापासून बनणाऱ्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 12 हजार कोटींची आसपास आहे.

आतापर्यंत सदरील गुन्ह्यात 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ह्यात कारवाईत केमिकल तज्ञ यांना अटक करण्यात आली आहे तर सदरच्या दोन कंपन्या केमिकल वितरक असून त्या त्यापैकी एक शासनाकडे नोंदणीकृत आहे, त्यातून विविध ठिकाणी केमिकल पुरवठा होत होता. तर ड्रग्स कारखान्याचा मालक हा उच्च शिक्षित असून त्याने बीएसी कम्प्युटरची पदवी घेतलेली आहे, त्याच्यावर ह्यापूर्वी एक केंद्र शासनाच्या अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एन. सी.बी.) यांच्याकडे एक गुन्हा दाखल आहे. तर तयार केमिकलचा माल आणि कच्चा माल राज्यात वितरित होत होता, तर त्यापासून बननारे ड्रग्स हे मुंबई सह कोकण प्रांतात वितरत होते.

पोलिसांनी आजपर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे, त्यांच्याकडून आतापर्यंत 5 किलो 968 ग्राम एमडी ड्रग्स जप्त केला आहे, 27 मोबाईल फोन, तीन चारचाकी वाहने व एक मोटार सायकल, चार इलेक्ट्रिक वजन काटे एमडी बनवण्याचे साहित्य एमडी अंमली पदार्थ बनण्यासाठी वापरण्यात मुद्देमाल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करत आज ते त्यांना न्यायालयात हजर करून मीरा-भाईंदर कडे रवाना करणार आहेत.

सदरची कारवाई ही आतापर्यंतची महाराष्ट्रातील सर्वात मोठी एमडी ड्रग्स विरोधाची कारवाई मीरा-भाईंदर पोलिसांनी केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा – 4 चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पुष्पराज सुर्वे, सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे श्रीमंत जेधे, सहाय्यक फौजदार मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, संतोष मदने, अविनाश गर्जे, अशोक पाटील, पुष्पेंद्र थापा, संजय लांडगे, संजय शिंदे, पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी, प्रवीण पवार, रवींद्र भालेराव, रवींद्र कांबळे, समीर यादव, संदीप शेरमाळे, अश्विन पाटील, गोविंद केंद्रे, धनंजय चौधरी, विकास राजपूत, विजय गायकवाड, मनोज चव्हाण, प्रशांत विसपुते, सचिन घुले, स्वप्निल मोहिले, सनी सूर्यवंशी, सुधीर खोत, पोलीस अंमलदार अंगद मुळे, नितीन राठोड, गौरव बारी सौरभ इंगळे, धीरज मेंगानेमसुबचे सचिन चौधरी, किरण आसवले व सहायक फौजदार संतोष चव्हाण यांनी कामगिरी केली आहे.

61 जणांवर कारवाई 11 कोटींचा मुद्देमाल जप्त –

ड्रग्स फ्री महाराष्ट्र अभियाना अंतर्गत मागील एक महिन्यात 61 ड्रग्स आरोपी आणि 11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ड्रग्स फ्री इंडिया मोहीम अंतर्गत 61 ड्रग्स लोकांना अटक करत 11 कोटींचे ड्रग्स साहित्य जप्त केले आहेत.